सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा कारभार यू-टर्न, स्थगिती आणि सूडाच्या कारवायांपुरता मर्यादीत राहिला. मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, वनीकरण असे फडणवीस सरकारचे अनेक महत्वाचे प्रकल्प आणि उपक्रम त्यांनी बासनात बांधले. मेट्रो कारशेड प्रकरणी त्यांच्याच सरकारने नेमलेल्या समितीनेही आरेचाच पर्याय उचलून धरला तरीही उद्धव ठाकरे यांनी कांजूर मार्गचे टुमणे लावून धरले.