22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषपवारांचे राजकारण अहिल्यादेवींच्या विचारांशी उभा दावा मांडणारे

पवारांचे राजकारण अहिल्यादेवींच्या विचारांशी उभा दावा मांडणारे

Google News Follow

Related

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचा अनावरण शरद पवार साहेबांच्या हस्ते होणे, हा तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्याच विचारांचा अपमान आहे. 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा नाव ऐकलं किंवा चित्र जरी डोळयांसमोर आलं तर सर्वप्रथम आठवतं की; दूरदृष्टी राजकर्त्या, शूर,धर्माभिमानी, धर्मपरायण, तल्लख बुद्धिमत्ता, अफाट इच्छाशक्ती असलेली वीरांगना मराठा साम्राज्याच्या इतिहासात पुण्यश्लोक अहिल्यादेवी याचं नाव घेतलं जातं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जेजुरी गडाची तटबंदी पासून ते होळकर काळात हिंदू देव देवतांचे मंदिर जेजुरी गडावर  बांधून काढलेलं आपणाला आजही बघायला मिळते.

वारसा हा विचाराने आणि कर्तृत्वाने चालतो. पण इथे ना कर्तृत्व आहे ना विचार मग कसा वारसा पुढं चालवत आहेत.? मराठा साम्राज्यात मराठा आणि धनगर समाज वैभवशाली होता. पण यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेबांच्या कालखंडात मराठा आणि धनगर समाजाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी झगडावं लागतंय, शिक्षणासाठी आरक्षण मगाव लागतंय हे कुणामुळे झालं? राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व समाजाला जोडण्याचे काम केले, पण इथे यांचा कधीही समाज जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. पवार साहेब नेहमीच म्हणाताट की, “हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आहे”, मग त्यांना आजपर्यंत का नाही म्हणावंसं वाटलं की, “हा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आहे?” इथे मी तुलना करत नाही आणि ती होऊच शकत नाही, पण वारसा पुढे घेऊन जात आहेत यावर माझा आक्षेप आहे.

जेजुरी गडासाठी, हिंदू धर्मासाठी, राजमाता अहिल्यादेवींनी केलेलं कार्य, भविष्यात येणाऱ्या अनेक पिढ्यापर्यंत लक्षात राहील असं आहे. पण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य गेली ५ दशके राजकारणात  असलेल्या नेत्यांना आज कळलं ही देखील लाजिरवाणी गोष्ट आहे. जेजुरी गडावर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णकृती पुतळा तब्बल अडीचशे वर्षांनी उभारण्यात यावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्या पुतळ्याच अनावरण जातीपातीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या हातून व्हावं हे जास्त दुःखद आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि इतर महापुरुषांचा वारसा शरद पवार साहेब चालवत असतील, तर वयाच्या २४ व्या वर्षांपासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या पवार साहेबांनी आजपर्यंत किती महापुरुषांचा ठेवा जपला आहे? साहेबांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी याचं स्मरण त्यांच्या वयाच्या ८१ व्या वर्षी झाले आणि पूर्णकृती पुतळा उभा करायला साहेबांच्या कारकिर्दीतली ५४ वर्षे लागली. 

परवा जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवारांच्या हस्ते झाले, पण त्याच्या आदल्या दिवशीच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका गरीब मेंढपाळाच्या हस्ते पुतळ्याचे अनवारण केले. या ठिकाणी जर शरद पवार साहेबांनी समजूतदारपणा दाखवून, मन मोठं करून गरीब मेंढपाळाने केलेल्या पुतळ्याचे पुन्हा अनावरण न करता तो पुतळा जनतेला अभिवादन करण्यासाठी खुला करून दिला असता तर पवार  साहेबांच्याबद्दल आदर निर्माण झाला असता. पण साहेबांनी तसं न करता, साहेबांनी  एकदा अनवारण झालेल्या पुतळ्याच पुन्हा अनवारण केले आणि एवढ्यावरच न थांबता जातिद्वेषक भाषण करून जातीपतीचे राजकारण करण्याचा डाव साधला. इथे पण साहेबांनी पेशवे आणि मराठा सरदार यात भेद दाखवण्याचा प्रयत्न केला.

जर शरद पवार साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकरांच्या विचाराचे असतील तर; साहेबांनी हज हाऊस साठी आग्रह धरला नसता. जर पवार साहेब अहिल्यादेवी विचारांचे असतील तर राम मंदिराला विरोध केला नसता. जर साहेब अहिल्यादेवी यांच्या विचारांचे अनुयायी असते तर त्यांनी स्वतः साठी काहीच न करता समाजासाठी, धर्मासाठी आपली राजकीय कारकीर्द झिजवली असती. जर शरद पवार साहेब अहिल्यादेवींच्या विचारांचे पाईक असते तर साहेबांनी समाजातील प्रत्येक जातीच्या उद्धराला प्राधान्य देऊन जातीभेद संपवला असता. 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी देशभरात हिंदूंसाठी मंदिरे बांधली त्यात अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या शिवाय सोरटी सोमनाथ ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धारही त्यांनी केला.  अहिल्यादेवी यांनी मंदिर व हिंदू धर्मस्थळाचा जीर्णोद्धार आणि विकास केल्याचे अनेक दखल आहेत पण कधी मशिदीचा जिर्णोद्धार केलेला कुठं ही आढळत नाही.

या उलट शरद पवार यांनी हिंदूंसाठी एखादं मंदिर तर सोडा,पण देशात होत असलेल्या राम मंदिराच्या विरोधात ते उभे आहेत. मंदिर बांधल्याने विकास होत नसतो म्हणणाऱ्या शरद पवार साहेबांना हज हाऊस ची हौस मात्र सुटत नाही. इथे ही अहिल्यादेवी आणि शरद पवारांच्या विचारांचा ताळमेळ लागत नाही. 

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना शेती आणि शेतकऱ्याचं हित कशात आहे हे चांगलं माहिती होतं. शेतकरी आणि शेतकऱ्याविषयी त्या अत्यंत गांभीर्याने विचार करायच्या.  त्यांचा असा ठाम विश्वास होता की, जगात अन्न पिकवणारा सुखी तर सर्वजण सुखी होईल म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. त्यांच्या मुलुखात प्रत्येक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गाई पालनाचे महत्व पटवून दिले, आणि गौवंश वाढीला प्राधान्य दिलं. पण शरद पवारांनी शेती असो की शेतकरी यांच्याबद्दल कधीही गांभीर्याने विचार केला नाही. देशाचे कृषिमंत्री पद उपभोगताना देशात रेकॉर्डब्रेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ज्या राज्यातून शरद पवार येतात, त्या महाराष्ट्राने शेतकरी आत्महत्येत अव्वल क्रमांक मिळवला. पवार साहेब कृषिमंत्री असताना विहीर, तलाव बांधणे तर सोडून द्या, त्यांच्या राज्यात हक्काचं पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला.

राजमाता अहिल्यादेवी यांची न्यायदानाची पद्धत ही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा काही वेगळी नव्हती. राजमाता अहिल्यादेवींचा मुलूख हा भिल्ल गोंड आदिवासी मुलूखाला लागून होता. त्याच्याबरोबर असलेले वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. पण त्याबदल्यात त्यांनी आदिवासी लोकांवर कधीही बळाचा वापर केला नाही. आदिवासी मुलूखातून जाणाऱ्या रस्त्याचा कर वसूल करणाऱ्याचा अधिकार त्यांनी आदिवासींना दिला. पण शरद पवार साहेबांचे आदिवासी लोकांबद्दल धोरण नेहमीच अन्याय करणार राहिले आहे. राज्यात मोठ्या वर्गाला आदिवासी अरक्षणापासून वंचित तर ठेवलं आहे. शरद पवार साहेब, मुख्यमंत्री असताना नागपुर अधिवेशनात आदिवासी समाजाचा मोर्चा विधानभवनावर धडकला. मोर्चामध्ये पुरुष , महिला, लहान लेकरं बाळ यांचा सहभाग होता. त्या मोर्च्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळीबारही करण्यात आला. त्यात  महिला, पुरुष, लहान मुलां सकट १०० जणांचं बळी गेला. 

हे सगळं इतिहासात वाचल्यावर एवढंच कळतं की, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे विचार आणि शरद पवार साहेबांचे विचार हे परस्परविरोधी आहेत. महापुरुषांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत म्हणताना, त्यांच्या ऐतिहासिक वास्तुंवर स्वतःचे नियंत्रण मिळवणे हा त्या महापुरुषांचा वारसा चालवणे आहे? की त्यांच्या संपत्तीवर नियंत्रण मिळवणे आहे? याचे उत्तर फक्त पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे अनुयायी देतील. आणखी एक गोष्ट याठिकाणी नमूद करावी वाटते की शिवलिंग हातात धरून धर्मपरायण स्त्रीचा वारसा नास्तिक पुरोगामी शरद पवार साहेब कधीही पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा