केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेला काही राज्यांमध्ये विरोध करण्यात आला. या योजनेचा निषेध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले होते. १४ जून रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर वायुसेनेत अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून चार दिवसांमध्ये तब्बल ९४ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून वायुसेनेकडून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवार, २६ जून रोजीपर्यंत ५६ हजार ९६० अर्ज मिळाले होते. तर, सोमवार, २७ जूनच्या सकाळपर्यंत ९४ हजार २८१ अर्ज वायुदालाकडे प्राप्त झाले आहेत. या योजनेमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून तरुणांना देश सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.
या योजनेची घोषणा होताच काही राज्यांमधून या योजनेला विरोध करण्यात आला होता. बिहारमध्ये या आंदोलनाचे पडसाद अधिक उमटले होते. मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. चार वर्षानंतर भरती केलेल्या २५ टक्के अग्निवीरांना लष्करात घेणार असून इतरांच्या रोजगाराचे काय असा सवाल तरुणांनी विचारला होता.
हे ही वाचा:
धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह
कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले
“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”
“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”
यानंतर देशातील काही मोठ्या उद्योगसमूहांनी अग्निवीरांसाठी आपल्या कंपन्यांची दारं खुली करणार असल्याची घोषणा केली होती. महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या अग्निवीरांना महिंद्रा कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी मिळतील अशी माहिती दिली होती. तर टाटा समुहाने देखील अग्निवीरांना टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये संधी मिळतील असे सांगितले आहे.