24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारण“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

Google News Follow

Related

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. यावर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर सणसणीत टीका केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आदित्य ठाकरे हे संजय राऊतांसारखं बोलायला लागले तर त्यांचं भविष्य वाईट आहे. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडून संयम घ्यावा,” असा खोचक सल्ला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

महाविकास आघाडीतील मंत्री उदय सामंत हे देखील आता शिंदे गटात सामील झाले आहेत. यावर दीपक केसरकर म्हणाले की, “मंत्री त्यांची पदं सोडून येत आहेत म्हणजे समजून जा किती नाराजी आहे. आपल्या जवळची माणसं का सोडून जात आहेत याचा विचार करायला हवा,” असे केसरकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी काल ओघात म्हटलं की घाण गेली. इतके दिवस आम्ही सोबत होतोच की. आमच्यासोबतच काम केलं. आमच्यासोबत गाडीतून फिरले.

हे ही वाचा:

“शिवसेना पक्ष प्रमुखांना राऊतांसारखा प्रवक्ता चालतो का?”

बंडखोर आमदारांवरील कारवाईची वकिलांनी सांगितली कायदेशीर बाजू

उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?

आता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी

“अद्याप तरी आम्ही एकटेच आहोत. कोणासोबत आघाडी करायची हे एकनाथ शिंदे ठरवतील. ३९ शिवसेना आमदार आणि १२ अपक्ष आमदार आहेत,” असंही दीपक केसरकर म्हणाले. “त्यांच्या उरलेल्या १४ आमदारांनी विलीन व्हावं. त्यांना राष्ट्रवादी जवळचं आहे तिथे त्यांनी जावं,” अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना म्हटलं की, “आई, वडिलांवर, कुटुंबावर आल्यावर आम्ही नाही सहन करणार.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा