महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याची चर्चा सध्या सगळीकडे जोरदार सुरू आहे. आणि अर्थात याची चर्चा सोशल मिडियावरही आहे. सरकार राहणार की पडणार या मुद्द्याला घेऊन अनेक प्रश्न लोक उपस्थित करतायत. आणि यात एक प्रश्न गंमत म्हणून लोकांकडून विचारला जातोय तो म्हणजे यंदाच्या आषाढी एकादशीला कोणते मुख्यमंत्री पांडुरंगाची मानाची पूजा करायला पोहचणार? आता हा प्रश्न जरी गंमतीने लोक विचारत असले तरी त्यामागे वास्तव आहे.