चमत्कार रोज होत नाहीत, असे म्हणतात पण देवेंद्र फडणवीस यांनी हा चमत्कार दुसऱ्यांदा घडवलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही आपलंस केलंय का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. विधान परीषदेतील निकाल आणि एकनाथ शिंदे यांचे नॉट रिचेबल होणे याला एका बाजूला देवेंद्र फडणवीस जबाबदार असले तरी ते एकटेच नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या घडामोडीत सिंहाचा वाटा आहे.