28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारण“एकनाथ शिंदेंचा विषय शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा”

“एकनाथ शिंदेंचा विषय शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा”

Google News Follow

Related

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घडामोडींवर भाष्य केले आहे.

मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अशा प्रकारची बंडाळी झाली होती, असं शरद पवार म्हणाले. त्यावेळी काही आमदारांना हरयाणात ठेवण्यात आलं होतं, असेही शरद पवार यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी उत्तर देण्याचे टाळत सेन्सिबल प्रश्न विचारा असं पत्रकारांना म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘परिस्थितीला सामोरे जाण्याची शिवसेनेत धमक नाही’

“एकनाथजी योग्य निर्णय नाहीतर आनंद दिघे झाला असता”

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’

एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्याला मुख्यमंत्री करतील, तो आम्हाला मान्य आहे, असं पवार म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं चालू आहे. आत्ता विधानपरिषदेलाही क्रॉसवोटिंग झालं. ते नेहमी होतं. मात्र सरकारला काही धोका नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा