काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने समन्स पाठवला होता. सोनिया गांधी यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
देशभरात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणे मुंबईतीलही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, या आंदोलनाचा घाट फसल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीचा निषेध करण्यासाठी मुंबईत महिला काँग्रेसचा आज दुपारी दोन वाजता ईडी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, मोर्चाचा ठरवलेला वेळे निघून दोन तास झाले तरी महिला जमल्याच नाहीत. शिवाय मोर्चाच्या ठिकाणी आंदोलकांपेक्षा पोलीस आणि पत्रकारांची संख्याच जास्त होती.
हे ही वाचा:
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदालनात आत्महत्येचा प्रयत्न
मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली
पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!
लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी
मोर्चासाठी महिला जमेनात म्हणून जमलेल्या २० ते २५ महिलांनी घोषणाबाजी करत मोर्चाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाई विरोधात घोषणाबाजी केली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी या महिलांना रोखताच महिला काँग्रेसचा मोर्चाचा हा अवघ्या १० मिनिटात आटोपला.