मुंबई उच्च न्यायालयात भर कोर्टात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संपत्तीच्या वादाचं प्रकरण प्रलंबित असल्याने या व्यक्तीने थेट न्यायदालनातच स्वतःची नस कापण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग टळला आहे.
तुषार शिंदे (५५) असं या व्यक्तीचं नाव असून तो माजी सैनिक आहे. संपत्तीच्या वादातून तुषारने आई वडिलांच्या विरोधात केस फाईल केली होती. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. मात्र निकाल त्याच्या आईवडिलांच्या बाजूने लागल्याने न्यायमूर्तींच्या दिशेने जाऊन त्याने स्वतःच्या हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनतर वेळीच सावधगिरी बाळगत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि गंभीर घटना टळली आहे.
हे ही वाचा:
मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली
पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!
लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी
अग्निपथ योजनेसाठी केंद्र सरकारने वाढवली वयोमर्यादा
तुषार शिंदे घाटकोपर येथे नातेवाईकांकडे राहतो. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात त्याला सोपवलं जाणार आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे. कठोर तपासणी करूनच उच्च न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जातो. त्यामुळे धारदार शस्त्र घेऊन तुषार शिंदे न्यायालयात कसे गेला? असा प्रश्न केला जात आहे.