इंडियन प्रीमियर लीगचे म्हणजेच आयपीएलचे सामने पाहणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्यामुळे हे सामने प्रक्षेपण करण्याची संधी कोणत्या कंपनीला मिळणार, यासाठी देखील लिलाव घेण्यात येतो. २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया पार पडली आहे.
भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क, तसंच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेजेसची विक्री यावेळी झाली. या लिलाव प्रक्रियेतून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) तब्बल ४८ हजार कोटी ३९० रुपये मिळवले आहेत. यंदा भारतातील टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने तर डिजीटल हक्कांसाठी वायकॉम १८ ने (Viacom18) बाजी मारली आहे. टीव्हीवर आयपीएलचे सामने हे स्टार स्पोर्ट्सवर दिसतील तर ऑनलाईन सामने वूटवर (Voot) दिसणार आहेत. पॅकेज सी ज्यामध्ये एका सीजनच्या १८ निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. ते वायकॉम १८ ने विकत घेतले आहे. तर परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे पॅकेज डी वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून विकत घेतले आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात महागडी लीग ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Since its inception, the IPL has been synonymous with growth & today is a red-letter day for India Cricket, with Brand IPL
touching a new high with e-auction resulting in INR 48,390 cr value. IPL is now the 2nd most valued sporting league in the world in terms of per
match value!— Jay Shah (@JayShah) June 14, 2022
हे ही वाचा:
कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’
प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात
‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’
डिजनी स्टारने टीव्हीसाठीचे हक्क आपल्याकडे कायम ठेवले असून यासाठी त्यांनी २३ हजार ५७५ कोटी रुपये मोजले. तर वायकॉम १८ कंपनीने डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क २० हजार ५०० कोटींना विकत घेतले. सी पॅकेज वायकॉम १८ ने २ हजार ९९१ कोटींना विकत घेतले आहे. तर परदेशातील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्सचे पॅकेज वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून १ हजार ३२४ कोटींना विकत घेतले आहे.