जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी सोहेल नावाच्या एका व्यक्तिस ६-६.५ किलो इम्प्रोवाईस्ड एक्स्प्लोसिव डिवाईस (आयईडी) सकट अटक केली आहे. या व्यक्तीस जम्मू बस स्टँड वरून अटक केली आहे.
जम्मू आणि काश्मिरच्या पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी, एएनआयला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना १५ छोटे आयईडी आणि ६ पिस्तुले सांबा येथे सापडली आहेत. पोलिस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा:
सिंग यांनी सांगितल्यानुसार पोलिस पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष होत आहेत, त्यामुळे घातपाताची शक्यता असल्याने पोलिस हाय अलर्टवर आहेत. चौकशी करताना कळले की अटक करण्यात आलेला इसम विद्यार्थी असून चंदिगढ येथे शिकत आहे.
सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल यास पाकिस्तानच्या अल्-बद्र-तन्झिमच्या कमांडकर करून इकडे ३-४ ठिकाणी आयईडी लावण्यास सांगण्यात आले होते. यात रघुनाथ मंदिर, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि जम्मू ज्वेलरी बाजाराचा समावेश होता. काम झाल्यानंतर हा व्यक्ति विमानाने श्रीनगर येथे पळून जाणार होता जिथे अल्-बद्र-तन्झिमचा हस्तक अथर शकिल खान हा त्यास भेटणार होता. यानंतर सोहेल अल्-बद्र-तन्झिमचा सभासद झाला असता.
चंदिगढ येथील काझी वसिम या व्यक्तिस देखील या कटाची माहिती होती. पोलिसांनी अबिद नबी नावाच्या आणखी एकाला देखील अटक केली आहे.
पाकिस्तानातील जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात ४० जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.