चित्रपट निर्माता आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एमआयएमचे आमदार आणि असदुद्दीन ओवेसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवत आहे. यावर अशोक पंडित यांनी संताप व्यक्त करत हा माणूस अजून तुरुंगात कसा गेला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
अकबरुद्दीन ओवेसी याचा हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणारा व्हिडीओ पंडित यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये तो, हिंदूंचे देवी-देवता कसे आहेत. गणेशजी, राम, लक्ष्मण आणि लक्ष्मी ही नावं ऐकली होती, रामनवमी आणि हनुमान जयंतीचीही माहिती होती, पण भाग्यलक्ष्मी, त्या कुठून आल्या, माहीत नाही, असं तो म्हणाला आहे. त्यावरून अशोक पंडित यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कधीच आहे हे माहिती नाही, मात्र ज्या पद्धतीने हिंदू देव देवतांवर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावरून त्याच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
यह बंदा जेल में क्यूँ नहीं है ?
इसके ख़िलाफ़ केसेज़ क्यूँ नहीं फ़ाइल किए गए हैं ?
इसके पुतले क्यूँ नहीं जलाये गए हैं ?
इसके पुतले को क्यूँ नहीं लटकाए गए हैं ?
कब तक हिंदू अपने देवी देवताओं का अपमान सहता रहेगा ?
क्या हमारा देश नपुंकसावाद में जीने लग गया है ? pic.twitter.com/8WjGkcWxmf— Ashoke Pandit (@ashokepandit) June 12, 2022
अशोक पंडित यांनी ट्विट करून त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. ते म्हणाले, हा माणूस तुरुंगात का नाही? त्याच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत? त्याचे पुतळे का जाळले जात नाहीत? त्याचा पुतळा का टांगला गेला नाही? किती दिवस हिंदू आपल्या देवी-देवतांचा अपमान सहन करत राहणार?आपला देश घराणेशाहीत जगू लागला आहे का?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा:
राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव
लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात
मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या
दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी हा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ आहे. त्याने अशी चिथावणीखोर वक्त्यव्य केल्याबद्दल तुरुंगवास देखील भोगला आहे. २०१२ मध्ये, एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये अकबरुद्दीन सांगत होता की, जर पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवले तर २५ कोटी मुस्लिम संख्या १०० कोटींच्या हिंदूंची हत्या करू शकतात. या प्रकरणी हैदराबादच्या निर्मल आणि निजामाबादमध्ये त्याच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो ४० दिवस तुरुंगात होता.