राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपा उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडलं आणि महाविकास आघाडीला मत न देणाऱ्या आमदारांची नावं माध्यमांसमोर बोलून दाखवली. तसेच भाजपावरही त्यांनी टीका केली. त्यानंतर त्यांनी ‘सामना’मधून भाजपावर टीका करत म्हटले की, पंकजा मुंडे यांना एकट पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
अतुल भातखळकर हे ‘टीव्ही ९’शी बोलत असताना म्हणाले की, “संजय राऊत यांनी भाजपाच्या विषयात चोमडेपणा करू नये. त्यांचे स्वतःचे आमदार सोबत नाहीत त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं,” अशी सणसणीत टीका अतुल भातखळकर यांनी केली.
“संजय राऊत हे काही दखलपात्र नेते नाहीत. त्यांची गटारगंगा रोज सकाळी वाहत असते. त्यांना असं वाटतं का मग की निवडणूक आयोग दबावाखाली आली. तसं आहे तर इतर तक्रारी केल्या होत्या ती मत का रद्द झाली नाहीत?” असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
“संजय राऊत हे त्यांच्या बेलगाम, अहंकारी आणि खोटं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज स्वतःचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत. स्वतःचे आमदार त्यांना सांभाळता येत नाहीत आणि याला संजय राऊतच जबाबदार आहेत,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. ‘समाना’चे संपादक होता येत का ते पहिले पहा. संजय राऊत यांनी काल हुशारक्या करून अपक्ष आमदारांची नावं घेतली. आता विधान परिषदेत गुप्त मतदान असणार आहे. तेव्हा हे काय करणार?” असा सणसणीत प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला.
हे ही वाचा:
रतन टाटा मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने सन्मानित
पुलवामामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
‘राज्यसभा निवडणूक निकालानंतर अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय’
“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”
शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाल्यानंतर संजय पवार यांनी माध्यमांसमोर अपक्ष आमदारांनी मत दिले नसल्याचे सांगितले. सोबतच त्यांनी काही अपक्ष आमदारांची नाव जाहीर केली आणि यांनीच मत दिले नसल्याचा दावाही केला. त्यानंतर काही अपक्ष आमदारांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.