24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषगुरू तसा शिष्य; अमोल मुझुमदारप्रमाणे सुवेदने पदार्पणातच ठोकले द्विशतक

गुरू तसा शिष्य; अमोल मुझुमदारप्रमाणे सुवेदने पदार्पणातच ठोकले द्विशतक

Google News Follow

Related

मुंबईचा फलंदाज सुवेद पारकरने पदार्पणातच दुहेरी शतक (२५२) झळकाविण्याचा पराक्रम केला आणि एका विक्रमाची नोंद केली. दुहेरी शतक झळकाविणारा तो रणजीच्या इतिहासातील १२वा भारतीय खेळाडू ठरला आहे. रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने बेंगळुरूच्या अलूर येथे झालेल्या सामन्यात ही कामगिरी उत्तराखंडविरुद्ध केली. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाची खेळीही ठरली आहे.

पण या विक्रमासह आणखी एका अनोख्या कामगिरीची नोंद झाली आहे ती म्हणजे त्याचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांनीही आपल्या पदार्पणात अशीच द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळे सुवेदच्या कामगिरीची विशेष चर्चा होत आहे. अमोल मुझुमदार याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हरयाणाविरुद्ध २६० धावांची खेळी केली होती. १९९३-९४मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील मार्क्सचा सात दशके जुना विक्रम त्याने मोडीत काढला होता. मार्क्सने २४० धावांची खेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना केली होती. त्या खेळीला अमोलने मागे टाकले होते.

हे ही वाचा:

७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ‘ही’ पाच नाव निश्चित

‘शिवसेनेची बी टीम कोणती हे स्पष्ट’

वनवासी क्षेत्रात धर्मांतराचे आव्हान

 

शिवाय, भारताच्या गुंडाप्पा विश्वनाथ यांनीही पदार्पणात २३० धावांची खेळी केली होती, तीही मुझुमदारने मागे टाकली होती. असे दमदार पदार्पण करणाऱ्या मुझुमदारप्रमाणे त्याच्या शिष्याने, सुवेदनेही द्विशतकी खेळी करून गुरूला एकप्रकारे दक्षिणाच दिली आहे. पण सुवेदला आपल्या गुरूची ती खेळी मात्र मागे टाकता आली नाही.

सुवेदच्या या ४४७ चेंडूतील खेळीत २१ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याने सर्फराज खानसह पाचव्या विकेटसाठी २६७ धावांची भागीदारीही केली. तर शम्स मुलाणीसह १०६ धावांची भागीदारीही केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा