25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणचैन पडेना आम्हाला; आमदार निघाले हॉटेलला!

चैन पडेना आम्हाला; आमदार निघाले हॉटेलला!

Google News Follow

Related

राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होत आहे. त्यासाठी आता महाराष्ट्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांचे आमदार सुरक्षित राहावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेत असे चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असून शिवसेनेचे आमदार बॅगा भरून तयार आहेत. येत्या ८ ते १० जूनच्या काळात त्या आमदारांना हॉटेलवर ठेवण्यात येईल. आमदार फुटू नयेत याची तजवीज करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

६ जूनला कपड्यांसह बॅगा घेऊन तयार राहा असे आदेशच शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार आमदारांना नेण्यासाठी बसेसही तयार आहेत. या आमदारांना कुठे नेणार आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. पण आमदार फुटून आपल्या राज्यसभा उमेदवाराला फटका बसू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत. संजय राऊत आणि संजय पवार यांनी अर्ज भरले आहेत. दुसरा उमेदवार निवडून आणणे हे मात्र अवघड काम आहे. त्यासाठी जादा मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे असलेल्या अतिरिक्त मतांची कुठेही फाटाफूट होऊ नये म्हणून आमदारांना एकत्र ठेवण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केलेला असताना भाजपानेही आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपात उभा केला आहे. त्यामुळे सहावा खासदार कुणाचा याविषयी चुरस आहे. भाजपाकडे १०६ मते असून शिवसेनेकडे ५५, राष्ट्रवादीकडे ५३ तर काँग्रेसकडे ४४ मते आहेत.

हे ही वाचा:

रायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह

घर सोडलेल्या मुलांचा आधारू !

मूसेवालाच्या हत्येचा आरोप असलेल्या संतोष जाधवची आई म्हणते…

अभाविप, राष्ट्रवादाचा हुंकार! युवशक्तीचा जागर!!

 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हाही बहुमत दाखविण्यासाठी आमदारांना एका हॉटेलमध्ये आणण्यात आले होते, त्याची आठवण यानिमित्ताने आली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा