दोन दिवसांपूर्वी लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये लष्कराच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आणि या अपघातात दुर्दैवाने सात जवानांना वीर मरण आले. या सात जवानांमध्ये महाराष्ट्राचे दोन सुपुत्र होते. कोल्हापूर आणि सातारामधले हे दोन सुपुत्र होते. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रशांत शिवाजी जाधव यांना वीरमरण आले. प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज, २९ मे रोजी त्यांच्या मूळ गावी बसर्गेमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र, दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला न पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे अनुकरण अनेक गावांमध्ये करण्यात येत आहे. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू कायम राहिलं आहे.
हे ही वाचा:
योगी सरकारचा महिलांसाठी निर्णय, सातच्या आत घरात!
पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम
देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी
‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा
प्रशांत जाधव यांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना मानवंदना देण्यात आली. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पश्चात पत्नी पद्मा, त्यांची ११ महिन्यांची मुलगी नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच २०१४ मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते.