महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी, योगी सरकार नेहमीच प्रयत्न करत आहे. यासंदर्भातच योगी सरकारने एक मोठे पाऊल उचललेले आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला तिच्या लेखी संमतीशिवाय सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर काम करण्यास भाग पाडले जाणार नाही. असे योगी सरकारने शुक्रवार, २७ मे रोजी आदेश दिले आहेत.
संध्याकाळी ७ ते सकाळी ६ दरम्यान कामाच्या वेळेत, त्या शिफ्टमध्ये इतर चार महिला असतील तरच एखाद्या महिलेला ऑफिसमधून काम करण्यास सांगितले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणाजवळ महिलांसाठी शौचालये, चेंजिंग रूम आणि पाणी पिण्याची सुविधा असणे अनिवार्य आहे. जर महिलांनी ७ नंतर काम करण्यास नकार दिला तर त्या महिलांना कामावरून काढता येणार नाही. तसेच जर कोणती महिला सायंकाळी ७ नंतर काम करत असेल तर त्या महिलेला मोफत वाहतूक सेवा देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम
देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी
‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा
पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद
जर एखादी महिला रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असेल आणि तिच्यासोबत कोणीही असभ्य वर्तन केले तर ती महिला तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार करू शकते. लैंगिक छळ रोखण्यासाठी कंपनीच्या मालकाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. या नियमाचे उल्लंघन किंवा अवमान केल्यास कंपनीला मोठा दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो. कार्यालयातून काम करणाऱ्या महिलांना इतर सुविधांसोबतच कंपनीला मोफत कॅब सुविधा द्यावी लागेल, असे योगी सरकारने आदेशात म्हटले आहे.