31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणपंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

Google News Follow

Related

रविवार,२९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केले आहे. यावेळी २६ मे रोजी देशातील मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे ‘मन की बात’ मधून पंतप्रधान मोदींनी देशवासियांचे आभार मानले आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच्या योग दिनाची थीम सांगितली आहे. ‘योगा फॉर ह्युमॅनिटी’, अशी यावर्षीची योग दिनाची थीम असणार आहे असं पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

२१ जूनला देशात योग दिवस साजरा केला जातो. यावर्षी योग दिवसाची ‘योग फॉर ह्युमॅनिटी’ अशी थीम असणार आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्यांनी योग दिनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. योगाला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

तसेच पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जपान दौऱ्यासंदर्भात देखील सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी जपानला गेलो असता तेथील कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्तींना भेटण्याचा योग आला. हे नागरिक जपानचे असले तरी त्यांच्या मनात भारताप्रती कमालीची ओढ आणि प्रेम दिसले, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

नेपाळमध्ये २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता

स्टार्टअप्समध्ये भारताची सेंचुरी; युनिकॉर्नची संख्या १०० वर

अनिल परबांनी मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली. त्यांनतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा