पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंत मान यांनी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्याने भगवंत मान यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी केली आहे. मंत्री विजय सिंगला यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात विजय सिंगला हे आरोग्यमंत्री होते. विजय सिंगला यांच्यावर अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशनची मागणी केल्याचा व भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. अखेर विजय सिंगला यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर भगवंत मान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी सिंगला यांना तत्काळ राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहे.
हे ही वाचा:
टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर चर्चेत
हरियाणवी गायिकेची हत्या, दोघांना अटक
‘आमच्या मंत्रिमंडळात एक टक्कादेखील भ्रष्टाचाराला थारा नाही. जनतेने आम आदमी पक्षाचे सरकारला मोठ्या अपेक्षेने साथ दिली आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आपल्याच मंत्र्यांला मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचा निर्णय पंजाबमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.