सोमवार, २३ मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने मोर्चा काढला आहे. ‘जल आक्रोश मोर्चा’ असा भाजपाने औरंगाबादमध्ये मोर्चा काढला आहे. यावेळी हा मोर्चा भाजपाने जरी काढला असला तरी महाविकास आघाडीबद्दल जो जनतेचा आक्रोश असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
या मोर्चाला जनतेने खूप गर्दी केली आहे. या मोर्चात जास्त महिलांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीसांसह रावसाहेब दानवे आणि भाजपाचे इतर कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी या मोर्चात सुरु आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, हा मोर्चा जरी भाजपाचा असला तरी, हा जनतेचा आवाज आहे. या मोर्चात महाविकास आघाडीबद्दल जनतेचा आक्रोश, असंतोष दिसत आहे. १ हजार ६८० कोटी रुपयांचा प्लॅन दिला आहे, तरीही ठाकरे सरकारने जनतेचा प्रश्न सोडवलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
चहा प्रेमींसाठी आला सोन्याचा चहा!
इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर
जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…
मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान
रावसाहेब दानवे म्हणाले, या आंदोलनात जास्त महिलांचा समावेश आहे कारण पाणीटंचाईची झळ ही जास्त महिलांना लागत आहे. हा मोर्चा राज्य सरकारविरोधात सुरु आहे. जनतेचे ही समस्या बघून सरकारने जनतेला लवकरात लवकर पाणी पुरवठा करावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे. पुढे ते हेही म्हणाले, १ हजार ६८० रुपयांची योजना ठाकरे सरकारने त्वरित मंजूर करावी. या मोर्चात जनताच जिंकेल आणि सरकारला जनतेला न्याय द्यावाच लागेल, असे भाजपा कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.