महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बहुचर्चित अशी सभा पार पाडली. मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल येथे पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर बोलणार होते. शिवसेनेने तशाच पद्धतीने या सभेची वातावरण निर्मिती केली होती. पण या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर हिंदू संघटनांवरच टीका केली. तर १९९० आणि १९९२ साली अयोध्या येथील रामजन्मभूमीला कारसेवेला गेलेल्या युवावा कारसेवकांचाही अपमान केला.
या सभेला मास्टर सभा असे नाव देण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे गदा देऊन स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी आमचे हिंदुत्व गदाधारी आहे असे म्हटले होते. त्यानुसारच त्यांना गदा देण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चुकीचे संदर्भ देत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली.
हे ही वाचा:
मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त
केतकी चितळेला पोलिसांनी घेतले ताब्यात
माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री
केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असा बुलेट ट्रेन प्रकल्प हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. तर जगातली सगळ्यात मोठे हिंदूंचे संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंमसेवक संघावरही उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले. स्वतंत्र लढ्यात संघाचा कुठेही सहभाग नव्हता असा खोटा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा युतीत आमची २५ वर्ष सडल्याचा दावा केला. तर सभेत खोटे दावे करतानाही आमच्या हिंदुत्वात खोटे बोलणे बसत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरूनही जबाबदारी झटकत काढता पाय घेतला. नामांतराची गरज काय? ते संभाजी नगर आहेच असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. सोमय्यांचा उल्लेख न करता त्यांना मिळालेल्या सुरक्षेवरून निशाणा साधला. तर सोमय्या यांच्यवर हल्ला झाल्यानंतर त्यांचे आलेले रक्त हे टोमॅटो सॉस असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याची सोडून या तीनपाटांना कसले सुरक्षा देताय? असे ठाकरे यांनी बोलून दाखवले.
यावेळी भाषणातून उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला गेलेल्या युवा कारसेवकांचाही अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना कारसेवा म्हणजे शाळा किंवा कॉलेजची ट्रिप होती का? असे नाटकी भाषेत विचारत उद्धव ठाकरे यांनी टीका करताना कारसेवेत सहभागी झालेल्या सर्व तरुण कारसेवकांचा अपमान केला. तर बाबरी पडली तेव्हा तुम्ही मैलभर पळाला होतात असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तर केतकी चितळे प्रकरणावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. शरद पवारांवर केतकी चितळेने केलेल्या टिकेवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जात आहे. आपण कोणावरही काहीही बोलावं का? पण यावेळी केतकी चितळेवर झालेल्या हल्ल्याबद्दल मात्र त्यांनी सोयीस्कर मौन पाळले.