वयाच्या २४ व्या वर्षी सविता कंसवाल हिने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. सविताने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आहे. १२ मे रोजी सविता आणि इतर तिघांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे.
उत्तराखंडच्या सीमांत जिल्ह्याच्या उत्तरकाशीच्या जिल्ह्यातील लोंथरू या छोट्या गावातील सविता कंसवाल हिने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर) यशस्वीपणे सर केले आहे. १२ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास सविता कंसवाल हिने हे. नेपाळचे प्रसिद्ध शेरफा बाबू यांनी सविताच्या एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईची माहिती इंटरनेटवर शेअर केली आहे. सविताने गेल्या वर्षी एव्हरेस्ट मासिफ मोहिमेअंतर्गत जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माउंट ल्होत्से (८५१६ मी) यशस्वीरित्या सर केले होते. ल्होत्से पर्वतावर तिरंगा फडकवणारी सविता कंसवाल ही भारतातील दुसरी महिला गिर्यारोहक आहे.
माऊंट एव्हरेस्टपूर्वी सविताने त्रिशूल पर्वत (७१२० मी), हनुमान टिब्बा (५९३० मी), कोलाहाई (५४०० मी), द्रोपदीचे दांडा (५६८० मी), तुलियान शिखर (५५०० मीटर) ल्होत्से (८५१६ मीटर) यांच्यासह जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर सर केले. आता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६) मीटरही सविताच्या खात्यात जमा झाले आहे.
हे ही वाचा:
यूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन
ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण
“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”
नातवंडे द्या, नाहीतर पाच कोटी भरपाई द्या; न्यायालयात केला अजब दावा
उत्तरकाशी जिल्ह्यातील भटवाडी ब्लॉकमधील लोंथरू गावात राहणाऱ्या सविताचे बालपण खूप आर्थिक संकटात गेले. सविता चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे.