26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषकर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

Google News Follow

Related

मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरून अजान देण्याच्या विरोधात महाराष्ट्रातून सुरू असतानाच आता कर्नाटकातही हे आंदोलन पोहोचले आहे. आता कर्नाटकमध्येही लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका मशिदीवर भगवा ध्वज लावण्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतली असून हे कोणी केले याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि ध्वज लावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पोलीस मशिदीच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करत होते, मात्र अद्याप त्यांना काहीही सापडलेले नाही. पण असे असले तरी या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्याची पुन्हा एकदा हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा

राजद्रोहाच्या सर्व खटल्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती!

आशियाई निवडणूक प्राधिकरण संघटनेच्या (एएईए) अध्यक्षपदी भारत!

एलॉन मस्क यांनी केली ही मोठी घोषणा

बेळगाव जिल्ह्यातील सत्तीगिरे गावातील मशिदीत पहाटे भगवा ध्वज फडकताना दिसला. हे गाव बेळगावच्या मुदलगी तालुक्यात असून, सकाळी नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांनी हा झेंडा पाहिला आणि मशिदीसह परिसरातील लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तो भगवा झेंडा हटवण्यात आला.

यापूर्वी कर्नाटकातील कडबा येथील चर्चवर भगवा ध्वज फडकावल्याची घटना घडली होती. गेल्या आठवड्यातच हे प्रकरण समोर आले होते. नंतर पोलिसांनी तो ध्वज हटवला असून तक्रार नोंदवून आरोपींचा शोध सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा