भारत हा जगातील सर्वात मोठा औषध उत्पादक आहे. सिरमच्या कोविशील्ड लशींचा पुरवठा भारताने यापुर्वीच अनेक अविकसीत आणि विकसनशील देशांना करायला सुरूवात केली आहे. नेपाळ, भूतान, श्रीलंका या शेजारील राष्ट्रांसोबत ब्राझील, बार्बाडोस यांसारख्या अटलांटिक पलिकडच्या देशालाही भारताने लस पुरवली होती. आता या यादीत कॅनडाचेही नाव जोडले जाणार आहे.
कॅनडा या देशात शिख समुदायाची मोठी वस्ती आहे. त्याबरोबरच कॅनडामधून सातत्याने स्वतंत्र खालिस्तानच्या मागणीला पाठिंबा दिला जात होता. सध्या देशात चालू असलेल्या कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडे यांनी चिंता देखील व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेउ यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे लशींकरता सहाय्य मागितले आहे.
याबद्दल दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामध्ये कोविड-१९ पासून आपापल्या नागरिकांचे संरक्षण, हवामान बदल, याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी करायच्या एकत्रित उपाययोजनांवर देखील विचार विनिमय करण्यात आला. यावेळी भारताने कॅनडाला कोविडच्या लसींचा पुरवठा करण्याचे देखील मान्य केले. याबरोबरच इंडो- पॅसिफिक क्षेत्रातील परस्पर सहकार्याची देखील चर्चा करण्यात आली.
Today, I had a good discussion with Prime Minister @NarendraModi on many important issues, and we’ve agreed to stay in touch. For a summary of the call, click here: https://t.co/vFGa8lkkQV
— Justin Trudeau (@JustinTrudeau) February 10, 2021
Was happy to receive a call from my friend @JustinTrudeau. Assured him that India would do its best to facilitate supplies of COVID vaccines sought by Canada. We also agreed to continue collaborating on other important issues like Climate Change and the global economic recovery.
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2021