एका बाजूला लाल मातीचा डोंगर घाट आणि दुसऱ्या बाजूला अथांग व स्वच्छ समुद्राचा नजारा. रस्ताही वळणावळणाचा. समुद्रात घुसलेल्या डोंगराच्या टोकामुळे निर्माण झालेले इथले दोन जुळे समुद्रकिनारे म्हणजे आरे आणि वारे. समुद्रकिनाऱ्यांच्या वरचढ असे हे जुळे किनारे. आज आपण या दोन समुद्रकिनाऱ्यांची सफर करूया.