27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामापरळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत?

परळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत?

Google News Follow

Related

चार दिवसांपूर्वी (७ फेब्रुवारी) पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली. पुजा चव्हाण असे या तरुणीचे नाव होते. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी तिच्या भावाबरोबर रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे.

मुळची परळीची असलेली २२ वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकायला आली होती. तिच्या भावाबरोबर ती पुण्यात हडपसरमध्ये राहात होती. रविवारी मध्यरात्री १ च्या आसपास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेले काही सापडले नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपाच्या महिला नेत्या आता आक्रमक झाल्या आहेत. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसे रीतसर निवेदनही देण्यात आले आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारे निवेदन भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिले आहे.

भाजपाचे आमदार अतूल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार या मंत्र्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. धनंजय मुंडेंना अशाच प्रकारे महिलेशी संबंध ठेवल्याप्रकरणी ठाकरे सरकारने पाठीशी घातले होते याची आठवणही त्यांनी करून दिली.

पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलीसांनी दिली आहे ना, पुजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सुचना देत असल्याचे  समजत आहे. हे संपूर्ण प्रकरण आता तापत असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियातून होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा