महाराष्ट्रात सध्या विविध राजकीय नेत्यांमध्ये अयोध्या वारीची चढाओढ सुरू आहे. इतके दिवस या सर्वापासून दूर असणाऱ्या काँग्रेस पक्षानेही आता यात उडी घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. शनिवार, ९ मे रोजी या संबंधिचे वृत्त समोर आले आहे. अयोध्येतील महंतांच्या निमंत्रणावरून पटोले हे आता अयोध्येला जाणार आहेत.
सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या दोघांच्या अयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. दोन्ही ठाकरे कुटुंबामध्ये यावरून असली नकलीचा सामना सुरू आहे. अशातच या दोघांच्या आधी रोहित पवार यांनी अयोध्येत हजेरी लावल्यामुळे चर्चांना उधाण आले.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’
योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव
सदावर्ते यांची नवी संघटना, ‘एसटी कष्टकरी जनसंघ’
शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले
या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय उलाढालीत आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील अयोध्या दौरा करणार असल्याचे समोर येत आहे. अयोध्येतील महंतांनी नाना पटोले यांना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी नाना पटोले यांची दादर येथे भेट घेत त्यांना अयोध्या दौऱ्याचे आमंत्रण दिले आहे. तर पटोले यांनी देखील या आमंत्रणाचा स्विकार केला आहे. त्यामुळे नाना पटोले आता अयोध्येला केव्हा जाणार याची चर्चा सुरू आहे. नाना पटोले यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली आहे.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय टिळक भवन, दादर येथे माझी भेट घेतली. pic.twitter.com/mHHlHH5Imc
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 9, 2022