26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषम्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

म्हसळा जवळील घोणसे घाटात बस कोसळली दरीत

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील म्हसळा येथे एक भीषण अपघात झाला आहे. म्हसळा येथे असलेल्या खासगी प्रवासी बस दरीत कोसळली आहे. घाटातून जात असताना एका वळणावर अचानक बस उलटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात आतापर्यंत चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या पैकी दोन प्रवाशांचा अपघात झाल्यावर जागीच मृत्यू झाला. तर दोन प्रवाशांचा मृत्यू उपचारा दरम्यान झाल्याचे समजते.

या बसमध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत होते याची ठोस माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण तरीदेखील २५ जण या अपघातात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या सर्व जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या सर्व प्रवाशांना म्हसळा ग्रामीण रुग्णालय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकराने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या’

सलमान म्हणतो, ‘आनंद दिघे आणि माझ्यात हे साम्य’

‘उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी’

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे झेंडे

ठाणे ते श्रीवर्धन असा या बसचा प्रवास सुरू होता. प्रवासी नेमके कोण आहेत आणि कशासाठी श्रीवर्धनला जात होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण तरी देखील हे सर्वच्या सर्व प्रवासी ठाण्याचे रहिवासी असल्याचे समजते. बस जात असताना तब्बल साठ ते सत्तर फूट अंतरावरून ती दरीत कोसळली आणि प्रवासी जखमी झाले

घोणसे घाटात अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही या घाटात बस दरीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी मदतीला पोहोचले आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसही सध्या घटनास्थळी दाखल झाले असून आपले तपास कार्य करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा