28 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारण'ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले'

‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’

Google News Follow

Related

राज्यात सध्या भोंगा मुद्द्यावरून राजकारण तापलेलं असताना ठाकरे सरकारल घराचा आहेर मिळाला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घाबरत असून म्हणूनच त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांनी राज्य सरकारवर आरोप करत मनसे प्रमुखांवर मुंबई पोलीस कारवाई करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबादमध्ये सभा घेण्यासाठी काही नियम ठरवण्यात आले होते, त्यापैकी राज ठाकरे यांनी १२ नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यानंतर राज यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही पोलिसांनी आजपर्यंत त्यांच्यावर का कारवाई केली नाही? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असेही संजय निरुपम म्हणाले. “मी सरकारला घाबरू नका, असे आवाहन करतो. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,” असे संजय म्हणाले आहेत

हे ही वाचा:

विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन जखमी

राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लीम डॉक्टरांनी दान केली एवढी मालमत्ता

महिला IAS अधिकाऱ्याच्या घरी ईडीला सापडलं मोठं घबाड

औरंगाबादमध्ये १ मे रोजी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर सभेमध्ये काही अटींचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा