बेकायदेशीर खाण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने शुक्रवार, ६ मे रोजी झारखंड मध्ये मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान जवळपास १९ कोटी रुपये झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या जवळच्या दोन व्यक्तींकडून जप्त करण्यात आले.
ईडीने केलेल्या कारवाईत एकूण १९ करोड ३१ लाख रुपये पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त केले तर १.८ कोटी रुपये हे दुसऱ्या ठिकाणावरुन जप्त करण्यात आले. काही कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकूण १८ ठिकाणी धाडी टाकल्या.
हे ही वाचा:
श्रीलंकेत पुन्हा आणीबाणीचे संकट
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तीन मराठी सिनेमांची वर्णी
महाविकास आघाडीला पुन्हा फटका, पवई सायकल ट्रॅकला मनाई
दिल्ली, पंजाब, हरयाणा पोलिसांच्या तावडीत सापडले भाजपा प्रवक्ते ताजिंदर बग्गा
या कारवाईत २ हजार, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त करण्यात आले आहेत तर या प्रकरणी ईडीने यापुर्वीच राम बिनोदप्रसाद सिन्हा यांना अटक केली होती. राम सिन्हा यांनी मनरेगाच्या २००७-०८ मधील निधीत १८ कोटींचा गैरव्यवहार केला होता. त्यानंतर ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिन्हा यांच्या चौकशी दरम्यान मनरेगाच्या निधीतील गैरव्यवहारात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघडकीस आली होती. त्यात आयएएस पूजा सिंघल यांचे नाव होते.