27 C
Mumbai
Friday, November 29, 2024
घरविशेष... म्हणून कोल्हापूर शहर १०० सेकंद झाले स्तब्ध

… म्हणून कोल्हापूर शहर १०० सेकंद झाले स्तब्ध

Google News Follow

Related

प्रत्येक शहरात नेहमी धावपळ गोंगाट सुरु असतो. मात्र महाराष्ट्रातील असे एक शहर आहे जे आज, ६ मे रोजी १०० सेकंद साठी स्तब्ध झाले होते. याचे कारणही तितकेच महत्वाचे आहे. रयतेचे राजे,पुरोगामी चळवळीचे प्रणेते आणि दूरदृष्टीने निर्णय घेणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. त्यांना १०० व्या पुण्यतिथिचे अभिवादन म्हणून अख्ख कोल्हापूर शहर १०० सेकंद स्तब्ध झाले होते.

संपूर्ण कोल्हापूर आज सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध झाले होते. कोल्हापूरचे नागरिक आज सकाळी १० वाजता जिथे असतील तिथे स्तब्ध होऊन छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली दिली. छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शाहू महराजांना, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले. तर, नागरिकांनी हातातील सर्व कामे सोडून १० याआधीच सर्व तयारी केली होती. यानंतर सर्वांनी आपापल्या कार्यालय, दुकानासमोर शाहूना आदरांजली वाहली.

छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध आहेत. ते एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती इ.स. १८८४ ते १९२२ दरम्यान होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक प्रगतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली.

हे ही वाचा:

आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक

राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा