राज्याच्या राजकारणात सध्या भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये भोंगा प्रकरण आणि बाबरी मशीद या मुद्द्यांवरून वाद रंगला आहे. भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, १ मे रोजी मुंबईत सभा घेऊन शिवसेनेवर घाणाघाती टीका केली होती. बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचा कोणता नेता तिथे होता असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या काही जुन्या बातम्या पोस्ट करत टीका केली होती.
यावर आता भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांनी बाबरी मशीद मुद्द्यावर बोलणं म्हणजे हलकटपणाचा कळस आहे,” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“जेव्हा बाबरी मशीद तोडली तेव्हा तुम्ही ‘सामना’चा पगार तरी घेत होता का? सामन्यामध्ये तरी होता का? आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्ही ‘लोकप्रभा’मध्ये लिहित होता,” असे नितेश राणे म्हणाले. “२६ एप्रिल १९९२ ला संजय राऊत यांनी ‘रामाची राजकीय फरफट’ असा एक लेख लिहिला आहे. राम मंदिराच्या विरोधात हा लेख लिहिला आहे. आता हेच संजय राऊत तोंड उघडून बोलत असतील तर हलकटपणाचा कळस आहे,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
तुम्ही कुठे होता..@rautsanjay61 pic.twitter.com/V6R8hd99xV
— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2022
एक आठवण .. @rautsanjay61 pic.twitter.com/Zq1kR4Nl7j
— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2022
हे ही वाचा:
‘४८ तासांत उद्धव, संजय राऊत माफी मागा…’
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक
‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका
देवेंद्र फडणवीस यांनी काल शिवसेनेवर टीकास्त्र डागलं होतं. “बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचे कोणते नेते तिथे होते. त्यावेळी ३२ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यात कोणत्या शिवसेना नेत्याचे नाव आहे. मशिदीचा ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता,” असे अनेक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले होते.