१ मे महाराष्ट्र दिन संभाजीनगर येथे सभा गाजवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी नवा आदेश दिला आहे. यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. आपल्याला कोणत्याही सणात बाधा आणायची नसल्याचे सांगत मनसेने हा पवित्रा घेतला आहे. तर भोंगे यांच्याबाबत पुढे काय करायचे हे मी उद्या ट्विटरद्वारे सांगेन असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय लिहिले आहे राज ठाकरेंच्या ट्विटमध्ये
उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा, आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कोणीही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच!
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
हे ही वाचा:
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक
‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’
योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले
महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे यांच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे. असे असले तरी राज ठाकरे यांनी दिलेला ४ मे चा अल्टिमेटम कायम असल्याचे सांगितले जात आहे. संभाजीनगर येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत. तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे ३ मे च्या ट्विटमधून राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात आणि ४ मे ला मनसेच्या माध्यमातून कशाप्रकारे आंदोलन केले जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.