25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणजमलंच तर तुटून पडाना, भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती तूप ओढणार आपणच...

जमलंच तर तुटून पडाना, भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर, किती तूप ओढणार आपणच आपल्या पोळीवर

Google News Follow

Related

फडणवीस यांनी कविता ऐकवून केला ठाकरे सरकारवर प्रहार

 

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेल्या बूस्टर सभेत ठाकरे सरकारवर आसूड ओढला. त्यावेळी त्यांनी कविता सादर करत महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

रविवारी  १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त फडणवीस यांनी हे भाषण केले. त्यात त्यांनी ही कविता सादर केली. विरोधकांवर तुटून पडा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ही कविता वाचून दाखविली आणि प्रेक्षकांनी ती डोक्यावर उचलून घेतली.

फडणवीस यांनी म्हटलेली ही कविता अशी-

 

जमलंच तर तुटून पडाना

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

किती तूप ओढणार

आपणच आपल्या पोळीवर

आला कोरोना

घर भरोना

हीच तुमची नीती ठरली

यशवंत म्हणतो,

मी तर माझ्या

मातोश्रीची झोळी भरली

कुणी घडीवर कुणी गाडीवर

कोट्यवधींचा वाढला वावर

जमलंच तर तुटून पडा ना

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

 

हे ही वाचा:

इंडोनेशियाने निर्यातवर बंदी घातल्यानंतरही भारत खाद्यतेलाच्याबाबतीत सुस्थितीत

“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली”

एप्रिलमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

केजीएफ-२ चित्रपटाने गाठला एक हजार कोटींचा टप्पा

 

 

कोरोना लाटेत

कोरोडेचे भरले गल्ले

मरणाऱ्यांचे टाहो मात्र

नाही तुमच्या कानी पडले.

ताव मारत राहिलात तुम्ही

कोविड सेंटरच्या मलाईवर

जमलंच तर. तुटून पडा ना,

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

 

अडीच वर्षाच्या कारकीर्दीत

मंत्रालयही पडले ओस

नातेवाईकांच्या हिताची

काहीजणांना भारी हौस

शेतकरी कष्टकरी सोडला

तुम्ही वाऱ्यावर

जमलंच तर तुटून पडा ना

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

 

लोडशेडिंगने वाजले बारा

वीजबिल वसुलीचा तुघलकी फेरा

उभय शिवार जळतंय

पाण्यावाचून घोटभर

जमलंच तर तुटून पडा ना

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

 

संपामुळे तीन महिने

बंद पडली लालपरी

हजारो कर्मचाऱ्यांची

वाळून गेली शिदोरी

तरीही फरक नाही

पडला तुमच्या मंत्रिपदांवर

जमलंच तर तुटून पडा ना

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

 

तुमच्या नाकर्तेपणामुळे

गेले ओबीसी आरक्षण

वर्ष झाले तरी सुरू

फक्त तुमचे सर्वेक्षण

वंचित ओबीसी

बांधव उपेक्षित

आता आहेत राज्यभर

जमलंच तर तुटून पडा ना

भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर

 

दलित आदिवासींच्या

प्रश्नाकडे तुमचा कायम कानाडोळा

खावटी अनुदान योजनाही

उडवून गेला तुमचाच कावळा

जमलंच तर लक्ष द्याना

कुपोषणाच्या प्रश्नावर

जमलंच तर तुटून पडा ना

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा