आपल्या धडाकेबाज विकास कामांसाठी प्रसिद्ध असेलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर येथे १० राष्ट्रीय महामार्गांचे उदघाटन केले आहे. एकूण २९२ किलोमीटर लांबीचे हे महामार्ग असून त्यांच्या बांधकामाचा एकूण खर्च तब्बल ८१८१ कोटी इतका आहे. या कार्यक्रमाला खासदार रणजित नाईक निंबाळकर, डॉ. श्रीजयसिद्धेश्वर महास्वामी , रमेश जिगाजिनगी , सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्ह्यातील इतर आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ३७ हजार २५ कोटी रुपये खर्चाची ३२ कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी १२ पूर्ण झाली आहेत तर ९ प्रगतीपथावर आहेत असे गडकरी यांनी सांगितले. आणखी २० हजार ४०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत , सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात वर्षात १ हजार ७७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे झाली असून ही वाढ १७३ % असून महाराष्ट्रात रस्ते बांधणीचे सर्वाधिक काम सोलापुरात झाल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा:
फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती
जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप
राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन
राणा दाम्पत्यांना एका प्रकरणात दिलासा
सुरत-चेन्नई ग्रीन एक्स्प्रेस महामार्गाचे काम सुरु असून यामुळे सुरतहून मुंबई-पुण्यमार्गे होणारी वाहतूक नाशिक-नगर-सोलापूर मार्गे थेट येईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच वेळ वाचेल. मुंबई-पुणे-बंगलोर मार्गाचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे ते म्हणाले.
या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी १७ हजार २०० कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जास्तीत जास्त इथेनॉल तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रीन हायड्रोजन हे आपलं भविष्य असून यात अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली.