राणा दाम्पत्यांना कलम १५३ ‘अ’ च्या अंतर्गत दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या कलमानुसार राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र राणा दाम्पत्यांनी सोमवारी न्यायालयात कलम ३५३ रद्द करून, पहिल्याच एफआरआय मध्ये त्याची नोंद करण्याची मागणी केली होती. तसेच, राणा दाम्पत्यांच्या जामिनावर २६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायालायने राणा दाम्पत्यांची एकाच एफआयआरमध्ये सगळे कलम सामील करण्याची मागणी फेटाळली आहे. परंतु, न्यायालयाने राणा दाम्पत्यांना एक दिलासा दिला आहे. दुसऱ्या एफआयआर मध्ये दाखल केलेल्या कलम ३५३ नुसार कोणतीही कारवाई करायची असेल तर ७२ तास आधी राणा दाम्पत्याला त्याची नोटीस द्यावी लागणार आहे.
एकाच दिवशी एफआयआर नोंदवले होते, मग ते वेगळे का नोंदवले असा सवाल राणा दाम्पत्यांनी केला. राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी आज न्यायलायत युक्तिवाद करताना हीच मागणी केली होती. मात्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांची मागणी फेटाळून लावली असली तरी दिलासा दिला आहे.
हे ही वाचा:
निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन
कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेंचा जामीन मंजूर
‘ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेले सरकार’
फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती
खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहले होते. त्यामध्ये त्यांची कोठडीत कशी गैरसोय केली जात आहे हे सांगितले होते. याचासुद्धा उल्लेख वकील मर्चंट यांनी न्यायालयात केला होता. तसेच, राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही केसच बोगस असल्याचे सांगितले आहे. तसेच, उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना फटकारले आहे. लोकप्रतिनिधी पदाचा गैरफायदा घेऊ नये असे उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना सांगितले आहे.