22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण'१८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांची मतदार नोंदणी महाविद्यालयातच व्हावी'

‘१८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांची मतदार नोंदणी महाविद्यालयातच व्हावी’

Google News Follow

Related

भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एक मागणी केली आहे. त्यांनी पत्रातून अशी मागणी केली की, विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करून घेताना त्याची नोंद विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातून व्हावी.

गंगाधरे यांनी पत्रात म्हटले की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकांसाठी मतदार यादया सुधारित करणे मतदारांनी यांच्या नावातील बदल करणे आदींची नोंदणी करण्याचे काम हाती घेतले जाते. नवीन मतदारांची नोंदणी करताना निवडणूक आयोगाच्या वतीने मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये विविध राजकीय पक्ष पुढाकार घेत नव्या मतदारांची नोंदणी करून घेतात. परंतु बऱ्याच मतदारांना राजकीय पक्षांच्या संपर्कात न येता स्वतंत्रपणे मतदान नोंदणी करण्याची इच्छा असते.

अशा वेळी १८ वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवाराला सोयीचे व्हावे म्हणून, ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्या ठिकाणी मतदार नोंदणीची प्रक्रिया राबवली जावी. जेणेकरून महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेल्या आणि महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक तरुण आणि तरुणीला आपले नाव मतदार यादीत नोंदवता येईल.अशी मागणी प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

राणांच्या समर्थनार्थ राणे

पाण्याची टाकी हटविण्याची कशिद-कोपर रहिवाशांची मागणी; १०० आंदोलकांना घेतले ताब्यात

हनुमानच शिवसेनेला धडा शिकवेल

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाला यासाठी विशेष मनुष्यबळ लावण्याची किंवा त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज भासणार नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला शिकत असलेल्या ठिकाणीच महाविद्यालयांमध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी. ज्यामुळे उमेदवारांची नोंदणी करण्याची मोहीम शंभर टक्के पूर्ण होऊ शकते. सद्यस्थितीत मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे राबवली जात नाही किंबहुना त्याला पूर्ण प्रतिसाद मिळत नाही. ही बाब लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगाला गंगाधरे यांनी विनंती ही विनंती केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा