24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण'राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले'

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

Google News Follow

Related

शुक्रवार, २२ एप्रिल रोजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावेळी राणा दाम्पत्यांनी शनिवारी, ९ वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ९ वाजले आणि शिवैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीच्या इथले बॅरीगेट्स तोडून राणा दाम्पत्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

राणा दाम्पत्य मातोश्रीवर जायला निघायच्या आधीच शिवसैनिकांनी हा हल्ला केला आहे. तसेच, राणा दाम्पत्यांना पोलिसांनी त्यांच्या दरवाज्याबाहेरच रोखले आहे. आणि पोलिसांनी राणा दाम्पत्यांना बाहेर न पडण्याचे सांगत होते.

यावेळी रवी राणा यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता ते म्हणाले, राणांच्या घरावर हल्ला करा, असे शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिले असतील, असा मोठा आरोप रवी राणा यांनी केला आहे. भगवंताला प्रार्थना करतो या सगळ्यांना बुद्धी येवो, बाळासाहेबांच्या विचारावर या सगळ्यांनी चालाव असे मी शिवसैनिकांना आवाहन करतो, त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालीसा पठण करणार. मात्र,पोलीस आम्हाला थांबवत आहेत, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे कळत नाही आहे. आमच्या इमारतीजवळ येऊन शिवसैनिक थेट हल्ला करत आहेत, असेही रवी राणा म्हणाले.

हे ही वाचा:

अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड

गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

‘टक्केवारी ‘ च्या हव्यासापोटी राज्यात विजेची कृत्रीम टंचाई

उमर खालिदचे भाषण आक्षेपार्ह, भडकावू आणि अवमानजनक

मोठ्या संख्येने शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या घरावर चालून गेले. बॅरीगेट्स तोडून शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावले आहेत. दरम्यान, राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा