22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषअमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड

अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड

Google News Follow

Related

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याने क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांच्या दांडी गुल केली आहे. पण आता तो सोशल मीडियावर आपल्या फिरकीची जादू दाखवताना दिसतो. ट्विटरवरून अमित मिश्रा अशाच एका ताज्या ट्विटमध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघातील माजी सहकारी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याला क्लिन बोल्ड केले आहे.

शुक्रवार, २२ एप्रिल रोजी इरफान पठाण याने एक ट्विट केले होते. “माझा देश, माझा सुंदर देश ज्याच्यात या भूतलावरचा सर्वोत्तम देश होण्याचे सामर्थ्य आहे. पण….” असे म्हणत इरफान पठाण याने आपले विचार व्यक्त केले होते.

हे ही वाचा:

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नवाब मलिकांना दणका; अटकेपासून संरक्षण नाहीच

सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!

इरफान पठाणच्या या ट्विट नंतरच अमित मिश्रा याने तशाच प्रकारचे ट्विट करत आपल्या जुन्या साथीदाराला उत्तर दिले आहे. “माझा देश, माझा सुंदर देश ज्याच्यात या भूतलावरचा सर्वोत्तम देश होण्याचे सामर्थ्य आहे. फक्त काही माणसांना याची जाणीव झाली पाहिजे की देशात सर्वात पहिले ज्या पुस्तकाचे पालन केले गेले पाहिजे ते म्हणजे भारताचे संविधान”

अमित मिश्रा यांच्या या ट्विटला समाज माध्यमांवर नेटकऱ्यांनी चांगलेच उचलून धरले आहे. एकीकडे अमित मिश्राच्या या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे इरफान पठाणला त्याच्या ट्विटसाठी ट्रोल केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा