24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणमुंबई महानगरपालिकेतील शिवसेना म्हणजे बकासूर!

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना म्हणजे बकासूर!

Google News Follow

Related

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला हल्लाबोल

मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेली शिवसेना ही पुराणकाळातील बकासुरासारखी आहे. कितीही खाल्ले तरी पोट भरत नाही. एवढेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेत जर बकासूर आला तर तोही म्हणेल की रिश्ते मे तो ये मेरे बाप लगते है, अशा शब्दांत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर घणाघात केला.

मुंबई भाजपाच्या वतीने ‘पोलखोल’ या अभियानाअंतर्गत कांदिवली येथे मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची चिरफाड करण्यात आली. मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या या मतदारसंघात या अभियानाअंतर्गत शिवसेना व मविआवर हल्लाबोल करण्यात आला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हीच ती मुंबईची भूमी आहे जिथे क्रांति मैदानात देशभक्त एकत्र आले. इंग्रजांविरुद्ध चलेजावचा नारा दिला. इंग्रजांची वृत्ती शोषण करणारी, अप्पलपोटेपणाची होती. मनात विचार केला १९४२चा चलेजावचा नारा अजूनही आपण देत आहोत. कारण अंग्रेज चले गए पर कुछ लोगो को छोड गये, अशी आपली अवस्था आहे, असा टोमणा मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला. ते म्हणाले की,  ऑलिम्पिकमध्ये अनेक क्रीडास्पर्धा होतात, कुणी गोल्ड जिंकतो, कुणी रौप्य जिंकतो, कांस्य जिंकतो. हे खरे आहे की, ऑलिम्पिकमध्ये चीन अमेरिकेसमोर आपण मागे राहिलो, पण भ्रष्टाचाराची स्पर्धा घेतली तर शिवसेनेची महापालिका गोल्ड मेडल जिंकेल.

शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या आधारावर चालत होती आताची शिवसेना नोटांच्या आधारावर चालते. तेव्हाची शिवसेना हिंदुत्वाकडे झुकत होती पण आताची शिवसेना खुर्चीप्रधान व्यवस्थेकडे झुकलेली आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, या पोलखोल आंदोलनात, जनआक्रोशात शिवसैनिकांनो तुम्हीही बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, अशा घोषणा देत महाविकास आघाडीविरोधात बोला. काय दिले यांनी मुंबईला भ्रष्टाचाराशिवाय, पेंग्विन आणून ठेवले, काही रस्ते केले, यावेळी ४५ हजार कोटींचे बजेट आहे. हा पैसा पेंग्विन आणणाऱ्यांचा नाही, वंचित, शोषितांचा पैसा आहे जे परिश्रम करतात. मुंबईची सेवा करतात. त्याबदल्यात मुंबईला काय मिळाले तर भ्रष्टाचार, गुणवत्तारहित काम. २१ हजार कोटी रस्त्यांसाठी खर्च केला. खड्ड्यांतूनही पैसे खाल्ले. धन आणि पाऊस मुंबईत बरसतो. मुंबईत ४०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी जमा होते. पण फाइल्सची कूर्मगती बघितली तर बकासूराप्रमाणे कुंभकर्ण पालिकेत आला तर तोही आत्महत्या करेल. तो म्हणेल, मी निदान सहा महिने झोपत होतो, पण हे वर्षानुवर्षे झोपले आहेत, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

हे ही वाचा:

‘गांधी कुटुंब सोडून अन्य कुणाकडेही काँग्रेसचे नेतृत्व द्या’

इजिप्तच्या जेवणात भारताचा गहू

देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची विशेष भेट

काँग्रेस अडचणीत असताना राहुल गांधी सुट्टीवर परदेशात

 

आम्ही हे आरोप करतो पण तेव्हा आमची बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत दोस्ती होती. उद्धव ठाकरे यांच्याशी आमची दोस्ती नाही. होणारही नाही. आमच्या आरोपांचे सोडा पण २३ मार्च २०२१काँग्रेसचे नेते रवी राजा मालमत्ता कराच्या वसुलीत ५०० कोटींचा घोटाळा असा आरोप केला. ते तर तुम्ही ज्या पक्षासोबत सरकार स्थापन केले त्याचेच आहेत. महापालिकेचा २३५८५ कोटीचा प्रॉपर्टी टॅक्स थकित आहे. नगरसेवक शौचालयाची मागणी करतो तेव्हा पाच कोटीही यांच्याकडे नाहीत. मी जेव्हा हे बारकाईने बघितले तेव्हा हे लक्षात आले की हा कर गरीब चुकवत नाही तर ऑडीने, मर्सिडिजने येणारे आहेत, तो चुकवतात. टॅक्स वसूल करता येत नाही पण बाकी वसुली तर केली जात आहे. त्यात तर १०० पैकी १२० मार्क मिळतील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

आपल्या सडेतोड भाषणात मुनगंटीवार म्हणाले की, रवी राजा म्हणतात, ५०० कोटींचा घोटाळा म्हणतात. काँग्रेस आज सरकारमध्ये आहे, रवी राजा हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा.आता नवी कल्पना आली आहे. समुद्राचे पाणी स्वच्छ करून लोकांना देणार. जे आकाशातून येते ते लोकांपर्यंत पोहोचवा. पण समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी कंपन्या येतील आणि त्यांचे जीवन गोड होईल, म्हणून हा सारा खटाटोप चालला आहे.

मी वनमंत्री होतो. वाघाचा स्वभाव असतो त्याचे पोट भरले की तो बाजूने जाणाऱ्या शिकारीकडेही बघत नाही. पण मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना बघतो तेव्हा जेवढे खातील तेवढे भ्रष्ट बनतात. यांच्याकडे बँक आहे ती आताच्या जन्मात त्या बँकेत पैसे टाकतील आणि पुढच्या जन्मी पैसे काढून घेतील, असे मुनगंटीवार म्हणाले.

भाजपाने समाजाच्या उन्नतीसाठी काम केले असे सांगताना मुनगंटीवार म्हणाले की, तेव्हा पूल कुणी बनवला नितिन गडकरींनी. बारामतींच्यांनी पूल बनवले नाहीत. २०१४ला आम्ही वेगळे लढलो. संस्कार होते दोस्ताची चूक माफ करू. सुधारण्याची संधी दिली. जोडून घेतले. पण मुंबईचा विचार कुणी केला. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मेट्रोचा प्रकल्प हाती घेतला. तुम्ही काय केले पण? तुमची मुंबई आहे ना मग काय केले आपल्या परिवारासोबत. आरेत बनू दिली नाही कारशेड. कारण ती देवेंद्रजींनी केले होते. आमचे काम बिघडविण्याचे ठरविले. २०२५ पर्यंत २३५ किमी मेट्रो झाली असती. हे प्रेम आहे मुंबईच्या प्रती. तुम्हाला प्रेमाशी नाही व्यापाराशी देणेघेणे आहे. अशा पार्टीच्या विरोधात ‘तख्त बदल दो, ताज बदल दो बेईमानो का राज बदल दो’ ही आमची भावना आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा