27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामागुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडली पैसे मोजायची मशीन

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडली पैसे मोजायची मशीन

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून कोठडीत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन मिळाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून जमा केलेल्या पैशातून काही मालमत्ता सदावर्ते यांनी खरेदी केल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांकडून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला असून या दरम्यान सदावर्ते यांच्या घरात पैसे मोजण्याची मशीन सापडली आहे. तसेच न्यायालयात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा:

सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?

ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

आदित्य ठाकरे यांना पत्र; बेस्टच्या ‘चलो ऍप’मध्ये उर्दूचा पर्याय द्या!

राज ठाकरेंनी या विषयांवर केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

परळमध्ये ६० लाखांची जागा विकत घेतली असून २३ लाखांची गाडीही खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे. भायखळ्यातही मालमत्ता खरेदी केल्याचे प्रदीप घरत म्हणाले. तर गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे वकिलांनी सांगितले. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर काही एसटी कर्मचाऱ्यांनीही त्यांना पैसे दिल्याचे म्हटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा