भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाने फिरणाऱ्या खोट्या पत्रावरून भातखळकर आक्रमक झाले आहेत. ‘ठाकरे सरकार हीच मोठी बनवेगिरी आहे…’ असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमके काय घडले?
मंगळवारी राज्यपाल भगतसिंहा कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाले. यामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत होते. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांची नावे राज्यपालांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदार बनण्यासाठी ६ नावे पाठवल्याचे या पत्रातून समोर आले होते. पण राज्यपालांच्या नावाने हे पत्र खोटे असल्याचे राजभवनाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
महापालिकेची पोल खोलच्या भीतीने शिवसैनिकांनी स्टेजची केली तोडफोड
कांदिवलीनंतर चेंबूरमध्ये भाजपच्या पोल खोल अभियान रथाची तोडफोड
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र निघाले ‘फेक’
यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. “राजभवनाने खुलासा केल्यानंतर हा विषय संपला पाहिजे. अशी बनावट पत्र सोशल माध्यमावर कोण फिरवत आहे? तर या महा विकास आघाडी सरकारचे नेतेच अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत. काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं की पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली, त्याच्या आधी सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या गेल्या आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे महाविकास आघाडी मधले असंतुष्ट आत्मे आहेत ते असे उद्योग करत आहेत. खरं तर सायबर पोलिसांनी याचा शोध घेतला पाहिजे. याच्या मधले गुन्हेगार शोधून काढले पाहिजेत. पण महा विकास आघाडीचे नेते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर नसलेले गुन्हे दाखल करण्यासाठी वापरले जात आहेत.”
ठाकरे सरकार हीच मोठी बनवेगिरी आहे… pic.twitter.com/HPkRlGY1bH
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 19, 2022