24 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरक्राईमनामाजहांगीरपुरी हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Google News Follow

Related

दिल्लीतील जहांगीरपुरी हनुमान जयंती शोभायात्रेत झालेले हिंसाचार प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. हिंसाचाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात यावी आणि संपूर्ण तपास समितीच्याच देखरेखीखाली व्हावा, असे आवाहन याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आले आहे.

विनीत जिंदाल यांनी ही याचिका केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, देशात अशा घटना वारंवार घडत आहेत. अनेक राज्यात घडत असलेल्या या घटना योगायोग नसू शकतात. त्यामुळे याचा तपस व्हावा असे जिंदाल यांचे मत आहे.

जहांगीरपुरी भागात शनिवारी संध्याकाळी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय २ अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. सुमारे २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणीचा तपास करण्यासाठी आता १० पथके तयार करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

कुरापती चीनने सीमेवर उभारले तीन टॉवर

कुचिक प्रकरणी माझ्यावरील आरोप धादांत खोटे

संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत; महाविकास आघाडीचे हेच धोरण आहे का?

मुंबई पोलिसांचा ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रीय

दिल्ली पोलिसांनी रविवारी १४ आरोपींना न्यायालयात हजर केले, तेथून १२ आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले, तर गोळीबारातील आरोपी अन्सार आणि अस्लम पोलिस कोठडीत आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. गृह मंत्रालयाने खबरदारी म्हणून CRPF आणि RAF चे जवान घटनास्थळी तैनात केले आहेत. दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.

दरम्यान, रामनवमी दिवशीही देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. शोभायात्रांदरम्यान होणाऱ्या दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे देशात तणाव निर्माण झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा