24 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारणआम्ही ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडत नाही, जनतेचा कौल स्वीकारतो

आम्ही ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडत नाही, जनतेचा कौल स्वीकारतो

Google News Follow

Related

कोल्हापूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी ठरल्या आणि भाजपाचे सत्यजीत कदम पराभूत झाले. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून लक्ष्य करण्यात येत आहे. मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावर टीका केली आहे.

आमदार भातखळकर म्हणतात की, चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आहे, असे म्हटले जात आहे पण अर्धा टक्का सुद्धा त्यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात नाही. भाजपा हा सामुहिक नेतृत्वावर चालणारा पक्ष आहे. आम्ही जनतेचा कौल स्वीकारला आहे. आम्ही काँग्रेससारखे ईव्हीएमची गडबड आहे असे म्हणत नाही. आम्हाला अपयश आले, हे मान्य. पण या निवडणुकीचे विश्लेषण केले तर २०१४ला आम्ही एकदाच लढलो इथे त्यावेळी ४० हजार मते होती. आज ७६ हजार मते आहे. २०१९ला जेवढी काँग्रेसला जेवढी मते होती तेवढीच मते पडली आहेत. विरोधकांची पोकळी भरून काढली आहे हे खरे विश्लेषण. या अपयशाचा ठपका एका व्यक्तीवर ठेवणे, एका व्यक्तीला जबाबदार धरणे ही भाजपाची पद्धत नाही. या निवडणुकीच्या बाबती हा मुद्दाही उपस्थित होत नाही. आमची भूमिका स्पष्ट, स्वच्छ आहे.

हे ही वाचा:

केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्या; भाजपा आक्रमक

मशिदीवरील भोग्यांसंबंधी मनसेला इशारा देणाऱ्या PFI नेत्यावर गुन्हा

मंदिरात इफ्तार, एकतर्फी सर्वधर्म समभावाचे चाटण

शरद पवार भाषण करताना व्यक्ती पोहोचला मंचावर

 

आमदार भातखळकर यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपा अडचणीत येण्याचा प्रश्नच कुठे येतो. ते आमचे गेली अडीच वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. याआधी ते महसूल मंत्री होते, बांधकाम मंत्री होते. ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या विधानामुळे पक्ष अडचणीत आला कसा असता?  २०१९ला आमचा विजय झालाच होता ना!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा