26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामादोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत

दोन एक्स्प्रेस धडकल्या; मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप विस्कळीत

Google News Follow

Related

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्स्प्रेस समोरासमोर येऊन अपघात झाल्याची धक्कादायक बाब घडली आहे. शुक्रवार, १५ एप्रिल रोजी रात्री ९.४५ दरम्यान हा अपघात घडला. गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्याने हा प्रकार घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

या अपघाताचा परिणाम शनिवार, १६ एप्रिल रोजीही गाड्यांच्या वाहतुकीवर दिसून येत आहे. संपूर्ण वाहतूक धीम्या मार्गावरून सुरू असल्यामुळे उपनगरीय गाड्यांची वाहतूकही २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे.

रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने माटुंगा रेल्वे स्थानकात पाँडिचेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने धडक दिली. या दोन्ही एक्स्प्रेस एकाच वेळी दादरहून निघाल्या होत्या, मात्र, माटुंगा स्थानकावर पुढे असणाऱ्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने गदग एक्स्प्रेसनं धडक दिली. यामुळे पाँडिचेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरले
दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाली.

हे ही वाचा:

रामदूत, अंजनि-पुत्र हनुमान

‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’!

अबब!! ‘KGF- Chapter 2’ची केवढी ही कमाई

शरद पवारांनी पुन्हा बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा काढला उकरून

दरम्यान, हा अपघात होण्यामागे नेमकं काय कारण ठरलं, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेविषयी देखील या अपघातानंतर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. तसेच या अपघाताची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा