23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाट्रॉली बॅगेत लपवले होते २४ कोटींचे ड्रग्ज

ट्रॉली बॅगेत लपवले होते २४ कोटींचे ड्रग्ज

Google News Follow

Related

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावरून तब्बल ३.९८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये किंमत २४ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दक्षिण आफ्रिकन व्यक्तीला एनसीबीने अटक केली आहे. मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

अटक केलेली व्यक्ती ही दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून मुंबईत आली होती. या व्यक्तीकडे असणाऱ्या ट्रॉली बॅगमध्ये अंमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या पथकाने या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली. त्यानंतर बॅगेच्या गुप्त कप्यात चार पिशव्या आढळून आल्या. बॅगाचा पुढचा भाग तोडल्यानंतर त्यात या पिशव्या आढळून आल्या.

हे ही वाचा:

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती

गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या

यामधून २४ कोटी रुपयांचे ३.९८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये एनसीबीने दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे ३.९ किलो हेरॉइन सापडले होते. कोरोना काळात ड्रग्ज तस्करी प्रमाण वाढले असून सीमाशुल्क विभाग, एनसीबी आदी तपास यंत्रणा विशेष दक्षता घेऊन कार्यरत झाल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा