भारतातील शेतकरी आंदोलनावर पॉप सिंगर रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतविरोधी ट्विट केले. या ट्विट्सच्या विरोधात भारतातील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी #IndiaTogether या हॅशटॅगने ट्विट केले होते.
यामध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंचा समावेश होता. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत आहे असा आरोप महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. हे कारण देऊन या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या ट्विट्सची चौकशी करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
कॉंग्रेस नेते आणी महाराष्ट्र सरकारने खालील सिलेब्रिटीजचे ट्वीट काळजीपूर्वक वाचावे. कॉंग्रेसच्या भाषेत सर्व भाषा सारखी आहे. आता ह्या सर्व सिलेब्रिटीज वर पण कारवाई करणार ? का आमच्या लता दीदी आणी सचिन त्रास देणार?@OfficeofUT @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/9JoG4RnGHs
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 8, 2021
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रेटीजच्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी केली होती. “एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.” असे सचिन सावंत यांनी या बैठकीत सांगितले.
अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा ईशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते. pic.twitter.com/SXTlYyq0JK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 8, 2021
“अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा ईशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.” अशी जळजळीत टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.