26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाश्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

Google News Follow

Related

भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका दिवळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. अखेर श्रीलंकेने मंगळवार, १२ एप्रिल रोजी स्वतःला दिवाळखोर घोषित केले. श्रीलंकेत परकीय चलनाचा तुटवडा असून त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह सर्व विदेशी ५१ अब्ज डॉलरचे कर्ज परत करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

एप्रिल २०२१ मध्ये श्रीलंकेवर एकूण ३ हजार ५०० दशलक्ष डॉलरचे कर्ज होते. पण, एकाच वर्षात हे कर्ज ५ हजार १०० दशलक्ष डॉलरवर पोहोचले. श्रीलंका आतापर्यंतच्या कर्जाची परतफेड करू शकलेला नाही. श्रीलंकेत सध्या परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विदेशी कर्जाची परतफेड करू शकणार नसल्याचे श्रीलंकेने काल जाहीर केले आहे.

आमच्यावर कर्ज असणारे इतर देश त्यांच्या कर्जावर व्याज आकारू शकतात आणि त्या कर्जाची रक्कम श्रीलंकन रुपयामध्ये मागू शकतात. आम्ही परकीय चलनामध्ये कर्ज फेडण्यास असमर्थ आहोत, असे श्रीलंकेच्या अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत १० कोटींचा ड्रग्स जप्त, दोन नायजेरियन अटकेत

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका

‘दहशत माजवण्याचा मविआ कडून प्रयत्न’

ती तरुणी खोटे का बोलत आहे माहीत नाही, पण मी अजूनही तिच्या पाठीशी!

श्रीलंकेवर जे कर्ज आहे, त्यातील ४७ टक्के कर्ज हे आंतरराष्ट्रीय बाजारातून घेतले आहे. यानंतर १५ टक्के कर्ज चीनचे, १३ टक्के एशियन डेव्हलपमेंट बँकेचे, १० टक्के जागतिक बँकेचे, १० टक्के जपानचे, २ टक्के भारताचे आणि ३ टक्के इतर ठिकाणचे आहे. दरम्यान श्रीलंकेतील जनता रस्त्यावर उतरली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा