27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणवंचितच्या सुजात आंबेडकरांनी ब्राह्मणांना केले लक्ष्य

वंचितच्या सुजात आंबेडकरांनी ब्राह्मणांना केले लक्ष्य

Google News Follow

Related

वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केले असून, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहे.

सुजात म्हणाले की, “आतापर्यंत आपण जेवढ्या दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहुजन मुले असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढा,अन्यथा हनुमान चालीसा लावू, अशी भूमिका घेतली होती. यांनतर अनेक राजकीय पडसाद उमटले,अनेक मनसैनिकांनी हनुमान चालीसा देखील लाऊडस्पीकर लावली होती.

यावरसुद्धा सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सुजात म्हणाले, माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे. आणि जर तुम्ही स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर दुसऱ्यांच्या मुलालाही उतरवू नका, अशी वादग्रस्त टीका आंबेडकरांनी ठाकरेंवर केली आहे.

हे ही वाचा:

नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप

गाझियाबादमध्ये अग्नितांडव, ४० गायी जिवंत खाक

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी रस्त्यावर उतरवण्याचे खुले आव्हान दिले आहे. राज ठाकरे हिंदू-मुस्लीम बद्दल बोलत असतील तर त्यांचा एकच हेतू आहे लोकांना धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकवून ठेवणं जेणेकरुन महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष देता येणार नाही, पण आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा