25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीकेजरीवाल यांनी काश्मिरी फाइल्सच्या उडविलेल्या थट्टेवर सोनू निगम वैतागला

केजरीवाल यांनी काश्मिरी फाइल्सच्या उडविलेल्या थट्टेवर सोनू निगम वैतागला

Google News Follow

Related

केजरीवाल यांनी काश्मिर फाइल्स चित्रपट खोटा आहे, असत्य आहे, असे जे म्हटले ते निंदनीय आहे. दिल्लीच्या विधानसभेत त्यांनी खिल्ली उडवत काश्मिरी पंडितांच्या वेदनांची थट्टा उडविली हे अजिबात समर्थनीय नाही, अशा शब्दांत गायक सोनू निगमने काश्मिर फाइल्स चित्रपटाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेत जे भाष्य केले त्यावर आपले स्पष्ट व परखड मत मांडले.

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल यांनी काश्मिर फाइल्स, लाऊडस्पीकर आणि हिजाबच्या मुद्द्यांचा परामर्श घेतला.

सोनू म्हणाला की, आपण अशा प्रत्येक हत्याकांडाबद्दल भावनिक असले पाहिजे. शीखांसह काय झाले, त्यामुळे मला वाईट वाटले. गोध्रात मुस्लिमांवरही अत्याचार झाले असतील पण माझ्या वडील, आई यांच्यासह असेच काही झाले असते तर काय झाले असते, असाही माझ्या मनात विचार येतो. माझी हिंमत झालेली नाही काश्मीर फाइल्स चित्रपट पाहण्याची. मी पाहिले आहे की, चित्रपट पाहिल्यावर लोक हमसून हमसून रडत आहेत. पण केजरीवाल म्हणत आहेत, की, ही फिल्म खोटी आहे, बनावट आहे, प्रचारकी आहे. त्यांनी भाजपाची खिल्ली उडविली असती तर माझी काहीही हरकत नाही. राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ शकतात. पण विधानसभेत या चित्रपटाला खोटे म्हणणारे केजरीवाल दुसऱ्या मुलाखतीत मात्र काश्मिरी पंडितांच्या बाबत वाईट घडले पण भाजपाने इतकी वर्षे त्यांच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारला तेव्हा मला फार विचित्र वाटले. एकीकडे केजरीवाल ही फिल्म खोटी आहे असे म्हणतात आणि दुसरीकडे काश्मिरी पंडितांच्या बाबतीत जे घडले ते वाईट होते असेही म्हणतात.

हे ही वाचा:

शाहबाज शरीफ झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

NGO च्या चौथ्या सेनेला चाप

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशमध्ये हिंसाचार, २७ जखमी

 

प्रत्येक धर्माच्या लाऊडस्पीकरला आक्षेप आहे 

सध्या गाजत असलेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर सोनू निगम म्हणतो की, हो मला लाऊडस्पीकरबद्दल आक्षेप आहे. पण ते सगळ्या धर्माबद्दल आहे. मी २०१७मध्ये यासंदर्भात योग्य तेच बोललो होतो. आज तर सौदी अरेबियानेही लाऊडस्पीकर बंद केलेत. लाऊडस्पीकरला विरोध करताना तो अजानला विरोध आहे, असे म्हटले जाते. पण तो लाऊडस्पीकरला विरोध आहे. अजान शेवटी लाऊडस्पीकरमधून येते. उद्या मी घरात लाऊडस्पीकर लावून गात असेन आणि त्याला कुणी आक्षेप घेतला तर तो माझ्या गाण्याला नाही तर लाऊडस्पीकरला असेल. तसेच लाऊडस्पीकरला विरोध म्हणजे अजानला विरोध नाही तर लाऊडस्पीकरला विरोध आहे. पण याची मोडतोड केली जाते.

हिजाबबाबतही सोनू निगमने स्पष्ट भूमिका घेतली. तो म्हणतो की, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा त्या नियमांचे पालन करावे लागते. शाळेत, विद्यापीठात जिथे एक युनिफॉर्म आहे त्याचे पालन करावे लागते. तुमचे याबाबतचे मत वेगळे असू शकते पण माझे मत हेच आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा